लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या युगपुरुषाची भूमिका साकारायला मिळणे, हा त्यांचाच आशीर्वाद असल्याची भावना अभिनेता सुबोध भावे यांनी मुंबईत व्यक्त केली.
‘लोकमान्य-एक युगपुरुष’ हा चित्रपट पुढील वर्षी २ जानेवारी रोजी प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने चित्रपटातील गाण्याच्या ध्वनिफितीचे प्रकाशन अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि पाश्र्वगायक शंकर महादेवन यांच्या हस्ते झाले, त्या वेळी सुबोध भावे बोलत होते.
एखाद्या दगडाला शेंदूर लावल्यानंतर त्या दगडालाही देवपण लाभते. त्या शेंदुरामागे लोकांची श्रद्धा आणि विश्वास असतो. मी स्वत:लाही असाच दगड समजतो की ज्याला अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने शेंदूर लावण्याचे काम रंगभूषाकार विक्रम गायकवाड, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केले आहे. माझ्या या भूमिकेचे सर्व श्रेय या सगळ्यांना असल्याचेही भावे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie lokmanya tilak by subodh bhave
First published on: 18-12-2014 at 06:23 IST