पहिल्या प्रेमाची गोष्टच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्यारविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.

आराध्यासोबत असं एन्जॉय करतायेत ऐश्वर्या आणि अभिषेक

ती सध्या काय करते ची कथा आहे तन्वी आणि अनुरागची. लहानपणी एकाच कॉलनीत वाढलेले, एकाच वर्गात शिकणारे आणि एकाच कॉलेजमध्ये जाणारे आणि एकमेकांशी घट्ट मैत्री असलेले हे दोघे. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी मैत्रीपलिकडची भावना आहे जी दोघांनाही उमगलेली नाहीये आणि जेव्हा ती उलगडते तेव्हा नेमका दुरावा येतो. एकमेकांपासून दूर गेले तरी अनुरागच्या मनात एक प्रश्न कायमच येत राहतो .. ती सध्या काय करते आणि याच प्रश्नाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

‘डॅडी’चा ट्रेलर पाहून अरुण गवळीने दिली ही प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झी स्टुडिओजच्या माध्यमातून यावर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केलं होतं तर अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयचंही या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले होते. त्याच्या सोबतीला असलेल्या आर्या आंबेकरच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. प्रेक्षकांची मने जिंकत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. याच चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर झी मराठीवर होणार आहे. अतिशय साधी परंतु मनाला भिडणारी कथा आणि तेवढाच सहज सुंदर अभिनय यांचा सुंदर मेळ असलेला हा चित्रपट बघायला विसरु नका येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. फक्त झी मराठीवर.