चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाही मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. मराठी चित्रपटांनी पाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘नाळ’च्या सुधाकर रेड्डी यांनी पटकावला आहे. या चित्रपटातल्या श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रियांका चोप्रा निर्मित ‘पाणी’ या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर अक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. स्वानंद यांनी या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं होतं.
मराठी चित्रपट
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)