अभिनेता सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर कशी तू’ काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या अल्बमने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली असून सध्या सोशल मीडियावर तो हिट ठरत आहे.

गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या ‘बेखबर कशी तू’ गीताला संगीतकार व्यान याने संगीतबध्द केले आहे. तर रॉकस्टार रोहित राऊतने हे गाणे गायले आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये या गाण्याला ८० हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून युट्युब ट्रेंडिंगवर हे गाणं सातव्या स्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे.

कमी कालावधीमध्ये या व्हिडिओला ८० हजाराहून अधिक लाईक्स मिळणं ही खरंच फोर मोठी गोष्ट आहे. श्रवणीय संगीत, अप्रतिम लोकेशन आणि उत्तम कलाकार या साऱ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे, असं ‘व्हिडियो पॅलेस’चे नानुभाई जयसिंघानी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बेखबर कशी तू’ हे गाणं पाहिल्यावर ते पुन्हा पुन्हा पाहत रहावसं वाटतं. विशेष म्हणजे या अल्बमच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रतिभावान नवोदित कलाकार असल्याचंही दिसून येत आहे, असं चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले.