चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध गीतकार असा त्याचा आज लौकिक आहे. मात्र त्याची ओळख तेवढय़ापुरतीच मर्यादित नाही. तो उत्तम चित्रकार आहे, व्यंगचित्रकार आहे, अभिनेता आहे, लेखक आहे, कविमनाचा तर तो आहेच. आणि तरीही कु ठल्याही पुरस्कार किं वा ग्लॅमरच्या झगमगाटांपासून गुरू ठाकूर हे नाव अलिप्तच आहे. जोपर्यंत रसिक आपल्या गाण्याला  आपलंसं करत नाहीत तोवर ते गाणं यशस्वी होत नाही. ‘मन उधाण वाऱ्याचे’ असो वा ‘देवाक काळजी’ या माझ्या गाण्यांना कधीही पुरस्कार मिळालेला नाही. मात्र अजूनही ती लोकांच्या ओठावर आहेत, याचाच अर्थ त्यांना दीर्घायुष्य लाभलं आहे. हे रसिकप्रेम हाच कलावंतासाठी खरा पुरस्कार आहे, असेच मी मानतो आणि त्यांना भिडतील अशीच गाणी मी लिहीत आलो आहे, असे गुरू ठाकूर यांनी सांगितले.

मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात गीतकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गुरू ठाकूर यांनी प्रत्येक वेळी आपल्याला हव्या त्याच क्षेत्रात नियोजनबद्ध के लेला प्रवासच यशाकडे घेऊन जातो हे गरजेचे नसल्याचे स्वानुभवावरून सांगितले. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून कधी गप्पा मारत तर कधी कवितेचे बोट धरून त्यांनी आपला आजवरचा बहुपेडी प्रवास उलगडला. संवादक मिलिंद कुलकर्णी आणि ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी त्यांना बोलते के ले. गीतकार म्हणून प्रस्थापित असलेल्या या कलावंताची सुरुवात मात्र व्यंगचित्रकारितेपासून झाली होती, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. तेव्हा ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून संधी कशी मिळाली, हा अनुभव सांगताना महाविद्यालयाच्या प्राचार्यामुळे आपली व्यंगचित्रे ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचली. तिथून बळ मिळालं आणि मग ‘मार्मिक’च्या कार्यालयात जाऊन स्वत:च विचारणा  केल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळी हाताशी गूगलसारखी साधने नव्हती. त्यामुळे राजकीय व्यक्ती, मुख्यमंत्री या सगळ्यांची छायाचित्रे पाहून ती लक्षात ठेवावी लागत असत. सतत व्यक्तींचे आणि आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण यामुळे ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून बस्तान बसले. त्या वेळी तिथे श्रीकांत ठाकरे यांची भेट झाली. त्यांनी नुसते निरीक्षण करण्यापेक्षा व्यक्ती वाचायला शिक, हा सल्ला दिला. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन पुढे अभिनयासाठीही उपयोगी ठरले, हे सांगतानाच एका कलेतूनच दुसऱ्या कलेची वाट सापडत गेल्याचेही त्यांनी सांगितले.

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी

रेषांकडून शब्दांकडे झालेला प्रवासही असाच अनपेक्षित होता, असे गुरू ठाकूर यांनी सांगितले. एकीकडे लेखन, चित्रपटातून अभिनय सुरू होता. त्याच वेळी ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक के दार शिंदे यांनी गीतलेखनाची संधी दिली. मी गाणी लिहू शके न, असा त्यांचा विश्वास होता. प्रत्येक वेळी कोणीतरी मला पाण्यात ढकलत गेलं आणि मी त्यातून हात मारत पोहायला शिकत राहिलो. गीतलेखनाचा प्रवासही यापेक्षा वेगळा नव्हता, असे त्यांनी सांगितले. मात्र ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाल्यानंतरही गीतकार म्हणूनच वाटचाल करण्याचे निश्चित केले नव्हते. त्या वेळी एकदा संगीतकार अशोक पत्की यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी तू फक्त गाणी लिही, तुझ्यात अस्सल गीतकार लपला आहे, असा मोलाचा सल्ला दिला होता.  गुरू ठाकू र यांच्या अनेक कविता समाजमाध्यमांवरून ज्येष्ठ कवींच्या नावाने फिरतात. सुरुवातीला आपल्या कविता लोकांना इतक्या उच्च दर्जाच्या वाटतात, हे पाहून आनंद व्हायचा. मात्र हा माझा जितका सन्मान आहे, तितकाच या ज्येष्ठ कवींचा अपमान आहे हे लक्षात आले. आणि या प्रकाराविरुद्ध बोलायला सुरुवात के ल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची ‘असे जगावे छाताडावर..’ ही कविता कविवर्य विंदांची कविता म्हणून समाजमाध्यमांवरून फिरते. ही कविता विंदांची नाही, आपली आहे हे अनेकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न के ल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कु ठलीही शहानिशा करता अशा पद्धतीने कवितांचा प्रसार करणाऱ्यांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त के ली.

कलाकाराला योग्य रसिक आणि समीक्षक दोन्ही योग्य वेळेला मिळायला हवेत. एकाअर्थी रसिक हा आईसारखा कलावंतावर प्रेम करतो, तर समीक्षक हा शिक्षकांसारखा योग्य दिशा दाखवतो.

*****

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिके चं लेखन केल्यानंतर पुन्हा कधीच मालिका लेखनाकडे वळावेसे वाटले नाही. कारण तोवर ‘डेली सोप’ हा प्रकार आला होता. ‘डेली सोप’मध्ये लेखनाला महत्त्व उरत नाही. लेखक सातत्याने बदलत राहतात. गोष्ट पुढे कशी जाणार?, हेच लेखकाला माहिती नसतं आणि मला तीच गोष्ट त्रासदायक वाटते. कलाकार म्हणून आपण कु ठे थांबायचं, कशाला नाही म्हणायचं हे स्पष्ट असलं पाहिजे. मी फक्त पैशासाठी मनाविरुद्ध काम करत राहिलो असतो तर माझ्यातील कलाकार मेला असता. सातत्याने मनाविरुद्ध काम करत राहायला लागणं यासारखी दुसरी भीती मला वाटत नाही.

*****

कलावंताला सर्जनशील प्रक्रियेसाठी एकांत गरजेचा असतो. एकांत आणि एकटेपणा यातला फरक लक्षात घ्यायला हवा. एकांत ही कलाकाराची गरज असते. अनेकदा लोकांना आपापल्या क्षेत्रात स्थैर्य अपेक्षित असतं. मला स्थैर्याची भीती वाटते. कलावंत हा अस्थिरच असायला हवा, तरच त्याला नवे काही शोधण्याची, नवे काही करण्याची ऊर्मी मिळत जाते.

गुरू ठाकूर