दुर्गामुळे सिद्धार्थ-अनुच्या मैत्रीत पुन्हा दुरावा ?

दुर्गाचा हा नवा प्रयत्न यशस्वी ठरणार का ?

अनु , सिद्धार्थ

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेमध्ये रोज नवनवी घटना घडताना दिसत आहेत. सिद्धार्थचं सत्य समोर आल्यानंतर अनुने त्याच्याशी बोलणं सोडून दिलं होतं. इतकंच नाही तर त्याच्यासोबत असलेली मैत्रीही तिने संपवली होती. या साऱ्यानंतर सिद्धार्थने पुन्हा एकदा अनुचा विश्वास संपादन केला असून तो तिच्या प्रेमात पडायला लागल्याचं दिसून येत आहे. मात्र या गोष्टीची चुणूक दुर्गाला लागली असून ती पुन्हा एकदा या या दोघांच्या नात्यात वितुष्टता आणण्याचा प्रयत्न करते.

सिद्धार्थला अनुचा सहवास, तिच्यासोबत गप्पा मारणं आवडू लागलं आहे. त्यामुळे ही त्याच्या प्रेमाची सुरुवात असल्याचं म्हटलं जातयं. काही दिवसांपासून सिद्धार्थची तब्येत ठीक नसल्याने तो घरीच आहे. हे सगळे होत असतानाच दुर्गाची इच्छा आहे सिद्धार्थने तिला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करावे. पण याबाबत सिद्धार्थला काहीही माहिती नाही. दुसरीकडे सिद्धार्थच्या आजीने अनुला तत्ववादींच्या घरी बोलावले असून अनु येणार म्हणून आनंदात असलेला सिद्धार्थ त्याची रुमही सजवतो. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुर्गा पोलिसांना बोलावते.

दुर्गाच्या या कारस्थानानंतर मालिकेला नवं वळण मिळणार असून अनु-सिद्धार्थला दूर करण्याचा दुर्गाचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर सुखाच्या सरींनी हे मन बावरे नक्की बघा.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi serial sukhacha sarine he man baware anu and siddharth

ताज्या बातम्या