मराठी गायिका सावनी रवींद्र हिचा फेसबुक अकाऊंट बुधवारी हॅक झाला. गुरुवारी सकाळी एका ई-मेलद्वारे तिला फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर धास्तावलेल्या सावनीने तातडीने फेसबुकच्या मुख्य कार्यालयात याविरोधात तक्रार नोंदवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारीची दखल घेत फेसबुककडून सावनीचा अकाऊंट पूर्ववत करण्यात आला आहे. सुदैवाने हॅकरने तिच्या अकाऊंटवरून कोणतेही पोस्ट केले नव्हते. ‘सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. सुदैवाने हॅक झाल्यानंतर माझ्या अकाऊंटवर कोणताही अनुचित पोस्ट करण्यात आला नाही. असे हॅकर्स लवकरात लवकर पकडले जावेत,’ अशी प्रतिक्रिया सावनीने दिली.

वाचा : शाहरुखच्या मुलीला कलाविश्वात मिळाला पहिला प्रोजेक्ट

कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वारंवार अशा घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड कलाकार अनुपम खेर, अभिषेक बच्चन, निम्रत कौर यांचेही ट्विटर अकाऊंट एका पाठोपाठ एक हॅक झाले होते. तुर्किश आर्मी ग्रुप या हॅकर ग्रुपने त्यांचे अकाऊंट हॅक केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi singer savani ravindra facebook account hacked
First published on: 15-03-2018 at 18:36 IST