पृथ्वीवरचा स्वर्ग अशी बिरूदावली असलेल्या काश्मीरचे सौंदर्यपाहून बॉलीवूडचा ‘दबंग’ खान सलमानला आपल्या पूर्वाश्रमीची प्रेयसी अभिनेत्री कतरिना कैफची आठवण झाली. बजरंगी भाईजान या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान सध्या काश्मीरमध्ये आहे. यावेळी काश्मीरच्या निसर्गसौंदर्याने आपण भारावून गेलो असल्याचे ट्विट सलमानने केले आहे.
नैसर्गिक सौंदर्याचा खजाना असलेल्या काश्मीरचे वर्णन शब्दांत करणे अवघड असून एका शब्दांत वर्णन करायचे झालेच तर, माशाअल्लाह!! असेच म्हणावे लागेल, असेही सलमान आपल्या ट्विटमध्ये म्हणाला. माशाअल्लाह म्हणता म्हणता..कतरिना कैफ देखील काश्मीरचीच असल्याचे आठवल्याचेही सलमानने ट्विट केले आहे.