लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अडकलेला प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने आता सोशल मीडियावर काही पुरावे सादर केले आहेत. ‘#MeToo मोहिमेचा मीच पीडित,’ म्हणत चेतनने इरा त्रिवेदीच्या मेलचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. इरानेच चेतन भगतवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आता तरी माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी करणं थांबवा, मी आरोपी नाही असं स्पष्टीकरण चेतनने दिलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१३ मध्ये इराने केलेल्या मेलचा स्क्रिनशॉट शेअर करत चेतनने प्रश्न विचारला की, ‘तुम्हीच सांगा आता कोणी कोणाला किस मागितलं? इराने मला पाठवलेल्या या मेलमधील शेवटची ओळ वाचा. ज्यामध्ये तिने kiss u miss u असं लिहिलं आहे. तिने माझ्यावर जे आरोप केले आहेत ते साफ चुकीचे आहेत. माझं आणि माझ्या कुटुंबियांचं मानसिक शोषण आता तरी थांबवा कारण या मोहिमेचा अनेकजण चुकीचा फायदा घेत आहेत.’

काय आहे प्रकरण?

एका महिलेने चेतन भगत यांच्यावर आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्स अॅपवरील चॅटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना चेतन भगत यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे संबंधीत महिलेची माफी मागितली होती. आपल्याला संबंधित महिला खूपच छान, चांगली आणि खूपच वेगळी वाटत होती. आपले लग्न झालेले असतानाही आपण अशा भावनांसह एखादे नातेसंबंध प्रस्थापित नाही करु शकत. मात्र, तरीही या महिलेशी माझ्या भावभावना जुळत असल्याचे मला वाटत होते. या महिलेशी आपण आगामी ‘वन इंडियन गर्ल’ या कादंबरीवरही चर्चा केल्याचा दावा भगत यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता.

या प्रकरणावरुन चेतन भगत यांनी आपली पत्नी अनुषा हीची देखील माफी मागितली असून बऱ्याच वर्षांत संबंधीत महिलेशी आपला संपर्कही झालेला नाही, तिचा नंबरही आपण डिलीट केला होता, असेही त्यांनी आपला बचाव करताना म्हटले होते.

More Stories onमीटूMetoo
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me too movement writer chetan bhagat denies allegations tweets images of ira trivedi kiss u miss u mail
First published on: 15-10-2018 at 17:01 IST