सध्या सुरु असणारे लग्नसराईचे वारे फक्त भारतापुरताच मर्यादित राहिले नसून परदेशातही याच वाऱ्यांची धूम पाहायला मिळत आहे. अगदी ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंतही लग्नसराईचे वारा पोहोचले आहेत. प्रिन्स हॅरी Prince Harry लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कले Meghan Markle यांच्या शाही लग्नसोहळ्याचा थाट नेमका कसा असेल याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. पण, त्यासाठी १९ मे २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे हेसुद्धा तितकेच खरे. तत्पूर्वी, कॅन्सिंग्टन पॅलेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या शाही जोडप्याच्या साखरपुड्याचे दोन रॉयल फोटो शेअर करण्यात आले आहेत.
वाचा : ..म्हणून सलमानच्या एक्स मॅनेजरला ऐश्वर्याने ठेवले कामावर
कॅन्सिंग्टन पॅलेसने ट्विट केलेल्या फोटोंमध्ये प्रिंस हॅरी आणि मेगनमधील प्रेम दिसून येते. एका फोटोत मेगन साखरपुड्यातील तिची अंगठी झळकवताना दिसते तर दुसऱ्या फोटोत हे जोडपे शाही अंदाजात पोज देताना पाहावयास मिळते. प्रिंस हॅरी आणि मेगनमधील हे सुंदर क्षण सेलिब्रिटी फोटोग्राफर अलेक्सी लूबोमिरस्की Alexi Lubomirski याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. याआधी अॅलेक्सीने जुलिया रॉबर्ट्स, बेयॉन्से, सलमा हयेक, केट विन्सलेट, अँजेलिना जोली आणि क्रिस्टन स्टुअर्ट यांचेही फोटो काढले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार प्रिंस आणि मेगनचे हे फोटो याच आठवड्यात फ्रॉगमोर हाउस येथे काढण्यात आले.
वाचा : पाहा, विराट-अनुष्काला पंतप्रधानांनी काय गिफ्ट दिले
Prince Harry and Ms. Meghan Markle have chosen to release official photographs to mark their engagement.
— The Prince and Princess of Wales (@KensingtonRoyal) December 21, 2017
Prince Harry and Ms. Meghan Markle, December 2017. pic.twitter.com/HrAc9FeN51
— The Prince and Princess of Wales (@KensingtonRoyal) December 21, 2017
Prince Harry and Ms. Meghan Markle, December 2017. pic.twitter.com/WHIMNNZzto
— The Prince and Princess of Wales (@KensingtonRoyal) December 21, 2017
‘डेली मेल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली होती. शाही घराण्यात घालून देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे हॅरीला मेगनशी लग्न करण्यासाठी ब्रिटनच्या राणीची रितसर परवानगी घ्यावी लागली. राजघराण्यात शाही मुकुटाचे मानकरी असणाऱ्यांमध्ये हॅरी पाचव्या क्रमांकावर असल्यामुळेच चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध होण्यासाठी त्याला राणीची परवानगी घ्यावी लागली. त्यानंतर काही दिवसांनीच राणीच्या सहमतीनेच हॅरी आणि मेगनचा साखरपुडा पार पडला होता.