चिरंजीवी सरजाच्या पत्नी व मुलाला करोनाची लागण

मेघनाच्या आई-वडिलांनाही करोनाची लागण

दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी अभिनेत्री मेघना राज आणि तिच्या बाळाला करोनाची लागण झाली आहे. मेघनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच मेघनाने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. मेघना आणि तिच्या बाळासोबतच तिच्या आई-वडिलांचे रिपोर्ट्सदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या हे सगळे क्वारंटाइन आहेत.

“माझे वडील- आई, मी आणि माझ्या बाळाचे करोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना आम्ही करोना टेस्ट करण्यास सांगितलं आहे. चीरु आणि माझ्या चाहत्यांना माझी एकच विनंती आहे की कोणीही काळजी करु नका. आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि योग्यती काळजी व उपचार घेत आहोत. ज्युनिअर चिरंजीवी सुद्धा ठीक आहे. एका कुटुंबासारखं आपण सगळे या संकटाला सामोरं जाऊ, विजय नक्कीच आपला असेल”, अशी पोस्ट मेघनाने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj)

दरम्यान, चिरंजीवी सरजा हा दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता होता. ७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवीचे निधन झाले. बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meghna raj wife of late actor chiranjeevi sarja and her newborn child infected with corona virus ssj

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या