‘पहिली ऑडिशन होण्यापू्र्वीच मिळाला नकार’, कार्तिक आर्यनने सांगितल्या जुन्या आठवणी

वाचा कार्तिक आर्यनची स्ट्रगल स्टोरी…

Kartik aryan
कार्तिक आर्यन

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ या सुपरहिट चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांचा आकडा आणखीनच वाढला आहे. पण कार्तिक आर्यनसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. पहिल्याच ऑडिशनला त्याला नकार पचवावा लागला होता. एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला.

‘एका डिओडरंटच्या जाहिरातीसाठी मी ऑडिशन द्यायला गेलो होतो. ती माझी पहिलीच ऑडिशन होती आणि मला बाहेरूनच नकार दिला होता,’ असं त्याने सांगितलं. बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळावा म्हणून कार्तिकने बरेच ऑडिशन्स दिले. यामुळे कॉलेजमधील हजेरी कमी झाल्याने शिक्षण मध्येच सोडावं लागल्याचंही त्याने सांगितलं होतं. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कार्तिक जेव्हा मुंबईत आला, तेव्हा तो 2 BHK फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होता.

वाचा : अमिताभ बच्चन यांनी वापरलेली मर्सिडीज OLX वर विक्रीला 

‘लुका छुपी’नंतर कार्तिक सध्या त्याच्या आगामी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर भूमिका साकारणार आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’चा हा रिमेक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mere ko bahar se hi reject kar diya tha kartik aaryan recalls his first audition ssv

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या