‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमाचा बहुप्रतिक्षित पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला. या आधीही या सिनेमाचे चित्रिकरणावेळचे फोटो आणि पोस्टर्स शेअर करण्यात आले होते. पण याआधीच्या पोस्टर्स आणि फोटोंपेक्षा आताचे पोस्टर फार वेगळे आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री परिनीती चोप्रा या पोस्टरमध्ये फार वेगळे दिसत आहेत. ते बंगाली पारंपारिक वेषात दिसत नाही. या दोघांना बघून ९० च्या दशकातले आमिर खान आणि जुही चावला आठवल्याशिवाय राहत नाहीत. हा सिनेमा पुढच्या वर्षी १२ मेला प्रदर्शित होणार आहे.

यशराज फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले. यात त्याने म्हटले की, ‘अभिमन्यू आणि बिंदूकडे तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. १२ मे २०१७ ला त्यांना नक्की भेटा.’

जर तुम्ही आयुषमान खुराना आणि परिनीती चोप्राचा हा लूक पाहिला तर त्यांच्यातली मैत्री खूप चांगल्या प्रकारे कळून येते. दोघंही आयुषमान आणि परिनीती पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. दोघंही खूप वेळेपासून मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. दोघंही आपआपल्या कामात व्यग्र आहेत. नुकतेच हे दोघे कोल्डप्ले येथे एकत्र दिसले होते.

अक्षय रॉय या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आयुषमान अभिमन्यू रॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. तो एक भूताच्या कथा लिहिणारा लेखक असतो. तर, परिनीती या सिनेमात गायिका दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, परिणीती चोप्रा ही उत्तम गायक असून आणि तिच्या आवाजात जादू आहे, त्यामुळे तिने या कलेचा गांभिर्याने विचार करायला हवा असा सल्ला अभिनेता आयुषमान खुराना याने तिला दिला होता. आयुषमान स्वत: उत्तम पार्श्वगायक आहे. त्याने अनेक सिनेमांत गाणी देखील गायली आहेत, इतकेच नाही तर अभिनयापेक्षा त्याचा आवाजाला प्रेक्षकांनी अधिक दाद दिली आहे. या अभिनेत्याने परिणीतीची स्तुती करताना तिच्या गायनाचे कौतुक केले आहे. परिणीतीचा आवाज हा फारच सुंदर असून तिने याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे इतकेच नाही तर अभियापेक्षा तिने गाण्यात करिअर घडवले पाहिजे असा सल्ला त्याने दिला आहे.