रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने यंदा चित्रपटसृष्टी गाजवली. काही महिन्यांपूर्वीच रिषभ शेट्टीचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा २०२२ मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणि त्यातल्या अभिनयासाठी रिषभ शेट्टींचं खूप कौतुक केलं गेलं. नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील कांतारा चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘कांतारा’ चित्रपटाने देशातच नव्हे तर परदेशातदेखील चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल चालले होते. कर्नाटकातील आगामी निवडणुकांसाठी अमित शाह सध्या कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण कन्नड भागात पुत्तुर या ठिकाणी त्यांची सभा होती. या सभेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेच त्याचबरोबरीने ‘कांतारा’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. भाषणादरम्यान ते असं म्हणाले, “मी नुकताच कांतारा पहिला, चित्रपट पाहिल्यावर मला या राज्याची परंपरा किती समृद्ध आहे ते कळले. देशात अशी फार कमी क्षेत्र आहेत जिथे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शेती करून देशाला समृद्ध करतात.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘फर्जी’मधली शाहिद कपूरची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; फोटो पाहिलेत का?
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवरही हा चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मूळ कन्नड चित्रपट असला तर तो आता हिंदी भाषेत डब केला असल्याने प्रेक्षकदेखील हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. हा चित्रपट कर्नाटकातील ‘भूत कोला’ या लोककलेवर आधारित आहे.
रिषभ शेट्टी या चित्रपटाचा सर्व्हेसर्वा आहे. लेखन, दिग्दर्शन अभिनय अशा तिन्ही गोष्टी त्याने सांभाळल्या होत्या. चित्रपटाला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपत आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे. रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.