scorecardresearch

जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमीचं अवघ्या २७व्या वर्षी निधन

जेरेमीचा मित्र आणि डिझायनर ख्रिश्चन सिरियानो याने त्याच्या मृत्यूची बातमी शेअर केली.

जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमीचं अवघ्या २७व्या वर्षी निधन
(फोटो – इन्स्टाग्राम)

जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमी रुहेलमनचं वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन झालंय. त्याच्या मृत्यूच्या बातमीने फॅशन विश्वात खळबळ उडाली आहे. जेरेमीचा मित्र आणि डिझायनर ख्रिश्चन सिरियानो याने त्याच्या मृत्यूची बातमी शेअर केली. जेरेमीच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

“मी यापूर्वी कधीही असं काहीही पोस्ट केलेलं नाही. पण इतकं सुंदर मन असलेला मित्र गमावणं खरोखर खूप कठीण आहे,” असं सिरियानोने जेरेमीचे फोटो शेअर करत लिहिलं आहे.

जेरेमी रुहेलमनने पेरी एलिस आणि सुपरड्री यांच्यासाठी मॉडेलिंग केलं होतं. त्याच्या निधनाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर सक्रिय होता, त्याने २० जानेवारी रोजी एक फोटोशूट केलं होतं. तिथले फोटो त्याने आपल्या अकाउंटवर शेअर केले होते.


दरम्यान, त्याचे चाहते निधनाची माहिती कळाल्यानंतर श्रद्धांजली वाहत आहेत. त्याचे मित्रही त्याच्या निधनाने धक्क्यात आहेत, पण जेरेमीचं निधन कशामुळे झालं, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या