मराठी सिनेमांची संख्या ही झपाट्याने वाढत असली तरी केवळ मनोरंजनात्मकच नव्हे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहेत. अशाच एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा “मोहर” हा सिनेमा २५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्ही.जी. एन्टरप्राईजेसच्या चंद्रकांत पंढरीनाथ पवार, संगीता गौतम सातदिवे आणि लीप एंटरटेनमेंटच्या गुरुनाथ मिठबावकर, आशिष राजे यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या “मोहर” सिनेमाचे दिग्दर्शन विजय पाटकर यांनी आहे.
“मोहर” सिनेमाची कथा निवृत्ती आणि तायनू यांच्याभोबाती गुंफण्यात आली आहे. या दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम, त्यांना दोन मुलं असा त्यांचा छोटेखानी संसार. निवृतीच आयुष्य ऋतू चक्रासारखच त्याच्या कुटुंबात अशाच आकस्मात आलेल्या वादळाने कोमेजत. समज गैरसमजातून निर्माण झालेल्या संघर्षात ते होरपळतात. तायनूच्या आयुष्याला पुन्हा “मोहर” येतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पहावा लागणार आहे.
“मोहर” सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, प्रसाद ओक, अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या मुख्य भूमिका असून सोबत विजय कदम, हेमलता बाणे यांचाही उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. बालकलाकार प्राजक्ता जगताप व चैतन्य घाडगे यांनी “मोहर” सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. मानसी नाईकने आपल्या दिलखेचक अदानी एक उत्तम लावणी सादर केली आहे. सिनेमाची कथा रेखा सुरेंद्र जगताप यांची असून पटकथा, संवाद दिपक भागवत यांनी लिहिले आहेत. हुल जाधव, सुरेंद्र आणि अनंत मोरे यांनी लिहिलेल्या गीतांना मिलिंद मोरे यांचे उत्तम संगीत लाभले असून सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, प्रसन्नजीत कोसंबी, कविता, चॅंन्ग, साक्षी यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. दिपाली विचारे यांनी या सिनेमासाठी कोरिओग्राफ़र म्हणून काम पाहिले असून कॅमेरामन म्हणून राजा फडतरे यांनी काम पाहिले आहे.
येत्या २५ डिसेंबरला “मोहर” हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohar marathi movie releasing on 25th december
First published on: 19-12-2015 at 01:07 IST