अभिनेत्री मोनालिसा लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘गस्त.’ या चित्रपटात मोनालिसा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तानाजी गालगुंडे आणि मोनालिसा बागल ही जोडी पहिल्यांदाच या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. दोघेही कमालीचे कलाकार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही जबरदस्त असेल यात शंकाच नाही. सैराट सारख्या सुपरहिट चित्रपटातील लोकप्रिय कलाकार बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे याच्या सोबत काम करण्याची मोनालिसाची पहिलीच वेळ. तानाजी व मोनालिसा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नक्कीच रंजक असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली, “मी गस्त या चित्रपटात सुजाता नावाची व्यक्तिरेखा निभावतेय. ती खूपच चंचल मुलगी आहे. ती अमर नावाच्या मुलाच्या प्रेमात आहे आणि त्याला भेटण्यासाठी ती कुठल्याही बहाणा करताना मागे पुढे पाहत नाही.”

पुढे ती म्हणाली, “मी पहिल्यांदाच तानाजीसोबत काम केलं आणि त्यांच्या सारख्या उत्तम अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ही एक अनोखी प्रेम कहाणी आहे आणि प्रेक्षकांना पाहताना खूप मजा येईल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monalisa bagal upcoming movie avb
First published on: 16-02-2021 at 16:40 IST