आपल्या लेकरासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरे जाते हे सर्वानाच ठाऊक आहे. मग ती ना समाजाची पर्वा करत ना आपल्या आयुष्याची. ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या पर्वात एक आई आपल्या मुलीला सन्मान मिळवून देण्यासाठी हॉटसीटपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती सर्व धडपड करताना दिसणार आहे.
मुलीसाठी ‘केबीसी’पर्यंत पोहोचण्याची ही किमया साधली आहे, मध्यप्रदेशमधील अजैगढ येथे राहणाऱ्या ‘खुशबू सिंग’यांनी. खुशबूने दोन वर्षांपूर्वी ‘केबीसी’मध्ये भाग घेतला होता. तेव्हा ती ‘फास्टर्स फिंगर फर्स्ट’ पर्यंत पोहचलीसुद्धा होती. पण, तिला हॉटसीटपर्यंत पोहचता आले नाही. त्यावेळी योगायोगाने खुशबू गरोदर होती. त्यामुळे तिच्या या अपयशाचे खापर सासरच्यांनी आणि नातेवाईकांनी तिच्या नवजात मुलीवर फोडले. आईच्या पराजयाला मुलगी जबाबदार असल्याचे बोलले जात होते. पण, आपल्या मुलीचा काहीही दोष नसताना तिला लोकांनी दुषणे लावलेली एक आई कसे सहन करेल? मुलीवरील हा कलंक पुसून टाकण्यासाठी खुशबूने परत ‘केबीसी’मध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ‘केबीसी’ त बिग बींकडूनच तिचे नामकरण करून घ्यायचे आणि हा दोषही पुसून टाकायचा, असा चंग तिने बांधला होता. यावेळी तिच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ती थेट हॉटसीटपर्यंत पोहचली. आपल्याला मिळालेल्या या संधीचा फायदा घेत तिने आपली गोष्ट अमिताभ बच्चन यांच्याकडे कथन केली आणि आपल्या मुलीचे ‘नामकरण’ करण्याची विनंती केली. बच्चन यांनीही तिच्या विनंतीला मान देत आपल्या नातीच्या ‘नव्या नवेली’ या नावावरुन खुशबूच्या मुलीचे ‘नवेली’ असे नाव ठेवले. इतकेच नाही तर बच्चन कुटुंबियांकडून प्रघात म्हणून त्यांनी छोटय़ा मुलीला सोन्याचा कडा भेट म्हणून दिला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2014 रोजी प्रकाशित
मुलीला सन्मान मिळवून देण्यासाठी आई ‘केबीसी’च्या हॉटसीटवर पोहोचली
आपल्या लेकरासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरे जाते हे सर्वानाच ठाऊक आहे. मग ती ना समाजाची पर्वा करत ना आपल्या आयुष्याची.
First published on: 17-08-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother reaches kbc to get her daughter honour