सप्टेंबर महिना तसा मराठी चित्रपटांसाठी फार काही आशादायी गेला नाही. यातील एका चित्रपटाचे चित्रीकरण तर अगदी तीन देशांत करण्यात आले होते. पण तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर फारशी हवा पाहावयास मिळाली नाही.  मात्र, ही निराशा दूर होईल अशी अपेक्षा आज प्रदर्शित होणाऱ्या दोन चित्रपटांकडून करायला हरकत नाही, असे म्हटले जातेय. आज ‘फॅमिली कट्टा’ आणि ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ हे दोन चित्रपट
गिरीश कुलकर्णीचं ताकदीचं लेखन आणि गिरीशच्याच नजरेतून झालेलं काटेकोर दिग्दर्शन आणि चित्रपटातील प्रमुख भूमिकेत त्याचा झालेला कसदार अभिनय या भन्नाट रेसेपितून निर्माण होणारी डिश म्हणजे ‘जाऊंद्याना बाळासाहेब’  हा चित्रपट सिनेखवैयांना एक चमचमीत मेजवानी असणार आहे. शिवाय गिरीश बरोबर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशी सरस आणि अनुभवी कलाकारांची फौज या सिनेमात पाहायला मिळतेय. एक खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. अजय- अतुल हे निर्माते म्हणून देखील या चित्रपटातून जोरदार आगमन करत आहेत! अजय अतुल यांच्यासह ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’या सिनेमाची निर्मिती केलेल्या पूनम शेंडे, अनुमती, पोस्टकार्ड, हाय-वे चित्रपटाची निर्मिती केलेले विनय गानू, ‘वळू’ आणि ‘गाभ्रीचा पाऊस’चे निर्माते प्रशांत पेठे आणि उमेश कुलकर्णी असे मराठीतले मोठे निर्माते या सिनेमाशी जोडले गेले आहेत.
आतापर्यंत ‘ब्रिंग इट ऑन बेबी’, ‘डॉल्बीवाल्या’, गोंधळ, चित्रपटाचा टिझर यामुळे ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ चित्रपटाबाबत सिनेरसिकांमध्ये उत्सुकता पाहावयास मिळत होती. आता हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तर जाणून घ्या कसा आहे ‘जाऊंद्याना बाळासाहेब’.