करोना व्हायरसमुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता सगळीकडे चित्रीकरणास परवानगी देण्यात आली आहे. पण सोशल डिस्टंसिंगचे सेटवर पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हॉलिवूड चित्रपटांमध्ये सेक्स सीन्सचे चित्रीकरण करण्यासाठी आता CGIचा वापर करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार १२ जून पासून हॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी फिल्‍म एडिटर्स ट्रेड असोसिएशनने २२ पानांची गाईडलाईन जाहिर केली आहे. यामध्ये कास्ट आणि क्रू मेंबर्सची दररोज टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच क्लोज कॉन्टॅक्ट सीन हे पुन्हा लिहिण्यात यावेत किंवा असे सीन्स सध्या टाळावेत असे म्हटले आहे. किंवा CGI च्या मदतीने हा सीन शूट करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

या २२ पानांच्या गाईडलाईनमध्ये लाईव्ह शोबाबत ही सांगण्याात आले आहे. लाइव्हशो हे ऑडियन्स शिवाय ब्रॉडकास्ट करण्यात यावेत असे म्हटले आहे. तसेच सर्वांनी चित्रीकरण करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे CGI?
सीजीआय म्हणजे कम्प्यूटर जेनरेटेड इमेजरी. ही एक अॅनिमेशची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये एखादे कॅरेक्टर किंवा एखाद्या व्यक्तीची हालचाल कम्प्यूटर प्रोग्रामद्वारे क्रिएट करता येते