सेलिब्रिटी पार्टी आणि महेंद्रसिंह धोनी हे समीकरण फारसे चांगले नाही. पण, ही चौकट मोडत धोनी चक्क सलमान खानच्या बर्थडे पार्टीला पोहोचला. क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या निमित्ताने एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीला भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंसोबतच बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. पार्टीत प्रत्येकजण धमाल करत असताना धोनीने मात्र अर्ध्यावरच पार्टीतून निघण्याचा निर्णय घेत तो थेट सलमानच्या पार्टीला गेला.
सलमानच्या ५२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल येथील फार्महाऊसवर जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबातील सर्व सदस्य आणि काही खास मित्रमंडळींच्या उपस्थितीत भाईजानने त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या धोनीने त्याच्यासोबत फोटोही काढले.
https://www.instagram.com/p/BdMe-mvBqT2/
https://www.instagram.com/p/BdMfi-Pl1ZT/
वाचा : ‘जब वी मेट・मधील गीतचा प्रियकर आठवतोय…
सुरज पांचोली, वैभवी मर्चंट यांच्यासोबतच ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमानसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिग्दर्शक अली अब्बास जफरसुद्धा सलमानला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या खास दिवसाच्या निमित्ताने सलमानच्या सेलिब्रिटी मित्रमंडळींनी पनवेलच्या फार्महाऊसची वाट धरली होती.