धोनीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पोस्ट, म्हणाली…

अनुष्काप्रमाणेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धोनीप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केलं आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने शनिवार (१५ ऑगस्ट) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.  धोनीने अचानकपणे केलेल्या या घोषणेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एम.एस. धोनीच्या निवृत्तीचीच चर्चा रंगली आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी असलेल्या अनुष्काने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने धोनीचे आभार मानले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनुष्काच्या पोस्टची चर्चा होत आहे. “कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी दिल्यामुळे मनापासून धन्यवाद एम.एस. धोनी”, अशी पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे. सोबतच तिने धोनीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे, अनुष्काप्रमाणेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धोनीप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केलं आहे.

anushka sharma insta story

भारतच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीचं नाव घेतलं जातं. धोनी जगातील असा एकमेव कर्णधार आहे ज्यानं आयसीसीच्या तिन्ही चषकावर नाव कोरलं आहे. धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये भारतानं टी २० चा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ चा एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलेलं नाव. हा पराक्रम कराणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ms dhoni retires anushka sharma thanks the former skipper for the memories ssj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या