विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘एक डाव धोबी पछाड’ या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. जोशी कुटुंबाच्या या कथेमध्ये सौ. समायरा जोशीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे तर श्री. शेखर जोशीच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहे.

अभिनेता सुबोध भावे याविषयी म्हणाला, ‘मुक्ता आणि मी दोघेही पुण्यातले आहोत. त्यामुळे आमची मैत्री आम्ही कॉलेजमध्ये असताना भाग घेतलेल्या, पुरूषोत्तम करंडक स्पर्धेपासूनची आहे. मुंबईत आल्यावर आम्ही ‘बंधन’ मालिका केली. त्यानंतर ‘एक डाव धोबी पछाड’ सिनेमा केला. ती माझी खूप जुनी मैत्रीण आहेच. पण तिच्या कामाबद्दल मला अतिशय आदरही आहे. तिच्यासोबत काम करताना मी नेहमीच रिलॅक्स असतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, ‘महाविद्यालयीन जीवनात लाखो तरूणींची धडकन ‘दी सुबोध भावे’ इथपासून ते माझा जिवलग मित्र सुब्या असा आमच्या दोघांच्या मैत्रीचा प्रवास झालाय. सुरूवातीच्या काळात सुबोधने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे कॉस्च्युम्सही मी केले होते. आणि ‘हृदयांतर’ आमच्या दोघांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय सिनेमा असेल.”

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ येत्या ९ जूनला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

hrudayantar-subodh-bhave-mukta-barve