अभिनेता किरण माने यांना ‘मुलगी झाली हो…’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून यावरून उलट- सुलट चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. किरण माने यांनी याप्रकरणी नुकतीच शरद पवार यांची भेट घेल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणावर स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिकेतील कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार योग्य तो न्याय करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी ‘मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर नुकतंच टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ‘मुलगी झाली हो…’ मालिकेतील कलाकारांनी किरण माने प्रकरणावर आपली भूमिका मांडली. किरण मानेंना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा आणि त्यांच्या राजकीय भूमिकेचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. अशी प्रतिक्रिया या कलाकारांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!

याशिवाय किरण माने यांनी नुकतीच मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतली यावरही मालिकेतील कलाकारांनी मत व्यक्त केलं. ‘या प्रकरणाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असली तरीही शरद पवार हे सुज्ञ नेते आहेत. त्यांना सत्य काय हे समजायला वेळ लागणार नाही आणि ते आम्हाला नक्कीच योग्य न्याय देतील.’ असा विश्वास मालिकेतील कलाकारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.