वाद आणि सेलिब्रिटी या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशाच वादाच्या भोवऱ्यांत बऱ्याचदा अडकणारी एक अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमीच विवि कारणांमुळे किंबहुना वादांमुळे प्रकाशझोतात आली आहे. आता कुठे तिने या साऱ्यापासून दूर जात पुन्हा एकदा कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली होती. तेव्हाच पुन्हा एकदा बी- टाऊनची ही क्वीन अडचणी सापडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगना, तिची बहीण रंगोली आणि तिची टीम यांच्याविरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने मुंबईतील पाली हिल येथे एक बंगला खरेदी केला होता. पण, या बंगल्याच्या खरेदीनंतर प्रॉपर्टी डीलरला त्याचा ठरलेल्या मोबदल्याची पूर्ण किंमत देण्यात आली नाही. दरम्यान, कंगनाच्या टीमकडून प्रॉपर्टी डिलरला ठरलेल्या रकमेनुसार एक टक्के कमिशन म्हणजेच जवळपास २० लाख रुपये देण्यात आले. पण, आता मात्र त्याने २ टक्के कमिशनची मागणी केली आहे.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

प्रकाश रोहिरा असं या प्रॉपर्टी डिलरचं नाव असून, जुलै महिन्याच्या अखेरीस त्याने कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai khar police summon bollywood actress kangana ranaut over real estate brokerage
First published on: 19-08-2018 at 15:42 IST