scorecardresearch

‘मर्डर मेस्त्री’ टिमची चैतन्यमयी गुढी

नव्या चैतन्याची, विचारांची, संकल्पनेची गुढी उभारत ‘ मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी सिनेमातील दिलीप प्रभावळकर व वंदना गुप्ते या कलाकारांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘गुढीपाडवा’ उत्साहात साजरा केला.

‘मर्डर मेस्त्री’ टिमची चैतन्यमयी गुढी

नव्या चैतन्याची, विचारांची, संकल्पनेची गुढी उभारत ‘ मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी सिनेमातील दिलीप प्रभावळकर व वंदना गुप्ते या कलाकारांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘गुढीपाडवा’ उत्साहात साजरा केला. नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करत प्रेक्षकांनी चांगले सिनेमे पाहावेत अशा शुभेच्छा दिलीप प्रभावळकर व वंदना गुप्ते यांनी दिल्या. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस प्रस्तुत ‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित राहुल जाधव दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या जून मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2015 at 03:31 IST

संबंधित बातम्या