जानेवारी महिन्यात नव्याने प्रकाशित होणाऱ्या ‘गणवेश’ या गाण्यांच्या अल्बमसाठी ‘गणवेश’ या विषयावरच काव्य मागविण्यात आले आहे. रसिकांनी पाठविलेल्या कवितांमधून सवरेत्कृष्ट सहा गाण्यांची निवड केली जाणार असून त्यांचा आल्बममध्ये समावेश करण्यात येणार आहे.
शालेय जीवनापासून सुरू झालेल्या गणवेश प्रवासाबाबतच्या आठवणींना काव्यात गुंफण्यासाठी नव्या गीतकारांचा शोध घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी रोजी आल्बमचे प्रकाशन केले जाणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेते आणि कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री मुक्ता बर्वे हे गीतांची निवड करणार आहेत.
संगीतकार निहार शेंबेकर व अतुल जगदाळे यांची संकल्पना असलेल्या या अल्बमसाठी काव्य पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असून vijayateentertainments@gmail.com या मेल आयडीवर काव्य पाठवायचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘गणवेश’ अल्बमसाठी नव्या गीतकाराचा शोध
जानेवारी महिन्यात नव्याने प्रकाशित होणाऱ्या ‘गणवेश’ या गाण्यांच्या अल्बमसाठी ‘गणवेश’ या विषयावरच काव्य मागविण्यात आले आहे.
First published on: 26-11-2014 at 06:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music album