अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच ‘नागिण २’ मालिकेचे चित्रीकरण संपवले. या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. सध्या मौनी तिचं व्हेकेशन एन्जॉय करतेय. ती आता कधी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची प्रतीक्षा तिचे चाहते करत होते. पण तिने मात्र याबाबत पूर्ण गुप्तता बाळगली होती. पण आता ती छोट्या पडद्याकडे न वळता मोठ्या पडद्यावर आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे. मौनी लवकरच अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या आगामी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गोल्ड’ सिनेमात पूर्वीचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मौनी योग्य असल्याची माहिती सिनेमाशी निगडीत एका व्यक्तीने दिली. ऑगस्टमध्ये मौनी २० ते २५ दिवसांचे सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण करेल. तिचं संपूर्ण चित्रीकरण अक्षयसोबत होणार आहे. सिनेमाचे लेखन राजेश देवरायज यांनी केले असून या सिनेमाची कथा पूर्ण काल्पनिक असल्याचे म्हटले आहे.

वाचा : पुन्हा जागा होणार भारतातील सर्वात मोठ्या ‘परमाणू’ चाचणीचा इतिहास

रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ हा सिनेमा पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होणार आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या संयुक्त निर्मितीत हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे. भारताला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक आणि ते मिळवण्यापर्यंतचा प्रवास यावर हा सिनेमा आधारलेला आहे.

वाचा : जाणून घ्या, विशेषाधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या ‘ट्युबलाइट’च्या छोट्या माटिनविषयी

सध्या, अक्षय कुमार आर बल्की यांच्या पॅडमॅन चित्रपटासाठी सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्यासोबत चित्रीकरण करत आहे. त्याचसोबत त्याच्या आगामी टॉयलेट : एक प्रेमकथा या चित्रपटाची प्रसिद्धीही तो करतोय. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naagin 2 actor mouni roys bollywood debut by akshay kumars gold
First published on: 22-06-2017 at 17:40 IST