गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत विवाहबंधनाचे वारे वाहत आहेत. छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहे. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मानंतर छोट्या पडद्यावरील आणखी एक जोडी लग्नबंधनांत अडकली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सयांतनी घोष हिने काल तिचा बॉयफ्रेंड अनुराग तिवारीसोबत कोलकातामध्ये सात फेरे घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून सयांतनी अनुराग तिवारीला डेट करत होती. सयांतनी ही ‘नागिन 4’ आणि ‘तेरा यार हूं मै’ यासारख्या मालिकेत झळकली आहे.

सयांतानी आणि अनुरागचा विवाह सोहळा अतिशय खाजगीरित्या पार पडला. यात तिच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर जवळचे लोक उपस्थित होते. या लग्नासाठी सयांतानी हिने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. त्यासोबत तिने लाल रंगाची टिकली लावली होती. सयांतनीनने तिचा ब्रायडल लूक अतिशय साधा ठेवला होता. यात ती फारच सुंदर दिसत होती.

तर दुसरीकडे अनुग्रह तिवारीने धोती-कुर्ता परिधान केला होता. या दोघांचा हळदीचा कार्यक्रमही रविवारी पार पडला. त्यासोबत दोन दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी तिने तिच्या आजीची साडी नेसली होती.

या साडीबद्दल बोलताना म्हणाली, “माझ्या आजीचे २०२० मध्ये निधन झाले. मी तिच्या सर्वात जवळ होती. ती माझ्या लग्नाला उपस्थित आहे याचा मला अनुभव घ्यायचा होता. विशेष म्हणजे मला माहिती आहे की ती मला आशीर्वाद देत आहे. त्यामुळे तिच्या आठवणीत तिने मला दिलेली साडी नेसायचे मी ठरवले.” असे तिने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सयांतनीने २००२ साली ‘कुमकुम : एक प्यारा सा बंधन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याशिवाय तिने ‘घर एक सपना’, ‘नागिन’, ‘ससुराल सिमर का’ आणि ‘नामकरण’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सयांतनी नुकतीच ‘नागिन ४ : भाग्य का जहरीला खेल’ या मालिकेत झळकली होती. मात्र या मालिकेत तिच्या भूमिकेला फारसा वाव मिळाला नाही.