दिग्दर्शनानंतर आता ‘नाळ’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे. वर्षभरानंतर नागराज मंजुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असून या चित्रपटातील अभिनयासाठी नागराज मंजुळे का तयार झाले याचा किस्सा त्यांनी नुकताच सांगितला.

नागराज मंजुळे हे ऑक्टोबर २०१७ मध्ये गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटातून पडद्यावर झळकले होते. आता वर्षभरानंतर ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अभिनयाद्वारे छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी पुन्हा अभिनयाकडे का वळालो हे सांगितले. नागराज मंजुळे म्हणाले, नाळ चित्रपटाचा दिग्दर्शक सुधाकर याच्यासोबत मी सैराट आणि पावसाचा निबंध या लघुपटात काम केले आहे. या चित्रपटात सुधाकर सिनेमॅटोग्राफर होता. सैराट चित्रपटानंतर सुधाकर माझ्याकडे नाळची कथा घेऊन आला. ती कथा मला भावली आणि अभिनयासाठी होकार कळवला, असे नागराज यांनी सांगितले.

सुधाकरला मे २०१६ मध्येच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करायचे होते. मात्र, त्यावेळी मी ‘सैराट’मध्ये व्यस्त होतो. (सैराटा चित्रपट एप्रिल २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.) सैराटला मिळालेल्या यशामुळे ‘नाळ’चे चित्रीकरण लांबणीवर पडले. चित्रीकरणासाठी उशीर झाला असला तरी मला यात काम करायचेच होते, असे नागराज मंजुळे यांनी आवर्जून सांगितले.

पाहा: ‘नाळ’ चित्रपटाचा ट्रेलर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, . ‘नाळ’ हा चित्रपट आठ वर्षांचा मस्तीखोर मुलगा चैतन्यवर आधारित आहेत. श्रीनिवास पोकळेने चैतन्यची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात चैतन्यच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी साकारली आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.