बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत ‘अझर’ या आगामी चित्रपटात चित्रीत केल्या गेलेल्या चुंबनदृश्यांच्या रिटेक्सवर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नर्गिस फाख्री हिने संताप व्यक्त केला. भारतीय संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीन यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात अझरुद्दीन यांची भूमिका साकारणाऱया इमरान हाश्मी आणि अभिनेत्री नर्गिस यांची काही चुंबनदृश्ये चित्रीत करण्यात आली आहेत. मात्र, दिग्दर्शकाने चुंबनदृश्ये पुन्हा पुन्हा चित्रीत करायला सांगणे हे हास्यास्पद आहे, असे नरगिस म्हणाली.

पाहा ‘अझर’ चित्रपटाचा ट्रेलर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटात चुंबनदृश्ये असणार आहेत याची मला कल्पना देण्यात आली नव्हती. चुंबनदृश्यांचे रिटेक्स आणि रिशूट करणं म्हणजे काही विनोद आहे का? चुंबनदृश्यांचे इतके रिटेक्स घेण्यात आले की चित्रपटासाठीचे मानधन खरतरं मी वाढवून घ्यायला हवे होते, असे नर्गिसने म्हटले. याशिवाय, चुंबनदृश्य चित्रीत करणे माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट आहे. कारण, त्यावेळी माझ्यावर खूप दडपण येते. मग टेक चांगला व्हावा आणि दडपण दूर व्हावे यासाठी मी सेटवर इतरांना विनोद सांगते. तुमच्यासोबतचा कलाकार समजूतदार असेल तर चुंबनदृश्य चित्रीत करताना सोपे जाते. इमरान खरंच खूप विनम्र आणि तरबेज अभिनेता आहे. त्याने चित्रीकरणावेळी माझ्यावर दडपण निर्माण होऊ दिले नाही, असेही नर्गिस पुढे म्हणाली.
दरम्यान, ‘अझर’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी चित्रपटगृहात दाखल होत असून चित्रपटात इमरान आणि नर्गिस सोबतच प्राची देसाई, गौतम गुलाटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.