बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर वृत्तमाध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत सर्व ठिकाणी चर्चा आहे. परंतु या चर्चेचा स्थर दिवसेंदिवस घसरत असल्याची तक्रार जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केली आहे. आपली धुणी चारचौघात कशाला धुवायची? असं म्हणत त्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी सुशांत प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “सुशांत प्रकरणातील चर्चेचा स्थर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. आता आपण किशोरवयीन मुलांसारखी भांडणं करत आहोत. जे आता पोस्टरवर देखील दिसत नाही ते कलाकार उठून टीका करत आहेत. आपली धुणी चारचौघात कशाला धुवायची? जर आपल्यापैकी प्रत्येकाने तक्रारींचा बडगा उगारण्यास सुरूवात केली तर फिल्म इंडस्ट्री ही पृथ्वीवरील सर्वात वाईट जागा म्हणून ओळखली जाईल.” असं म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Sushant Suicide Case: “किती दिवस पळणार? एक दिवस थकून मरशील”

सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे. “सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्ही सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah says debate on sushant singh rajputs death mppg
First published on: 01-08-2020 at 19:42 IST