मराठी चित्रपटांची भुरळ सध्या बॉलीवूडकरांनाही पडत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. सलमान, रितेश देखमुख यांसारख्या बड्या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तर ‘फॅण्ड्री’, ‘कोर्ट’सारख्या चित्रपटांची बॉलीवूड कलाकारांनी भरभरुन प्रशंसा केली. अशीच प्रशंसेची पावती मिळाली आहे ती आगामी ‘नटसम्राट’ या चित्रपटाला. खुद्द बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाबद्दल ट्विट केलेय.
मराठी रंगभूमीवर गाजलेले नाटक नटसम्राट हे लवकरचं रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाकडे सर्वच मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे. केवळ मराठी चित्रपटसृष्टीचं नाही तर अमिताभ बच्चनदेखील ‘नटसम्राट’च्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहेत. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचा ट्रेलर, मोशन पिक्चर आणि गाणे ट्विट केले आहे. तसेच, “मराठी सिनेमा अतिउच्चदर्जाचा होत चालला आहे. नटसम्राट – नाना पाटेकरचा उत्कृष्ट अभिनय आणि महेश मांजरेकरचे दिग्दर्शन,” या शब्दांत ट्विट करत बिग बींनी चित्रपटाची प्रशंसा केलीय. यावरूनच मराठी चित्रपट हा बॉलीवूडवर आपली छाप पाडत असल्याचे दिसून येते.
T 2086 – ‘NATSAMRAT’ a masterpiece on stage now on film trailer https://t.co/As1BJDBMe2) song https://t.co/NFlZlhYaAy
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 11, 2015
T 2086 -Marathi Cinema at incredible heights ! ‘NATSAMRAT’ Nana Patekar power filled enactment and Mahesh Manjrekar’s exalted Direction !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 11, 2015
T 2086 -NATASAMRAT- A milestone from Marathi theatre now a motion picture. https://t.co/CCOHA0efFL song https://t.co/NFlZlhYaAy — Amitabh Bachchan (@SrBachchan) December 11, 2015
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘नटसम्राट’ या नाटकात दिग्गज अभिनेते श्रीराम लागू यांनी साकारलेली अप्पा बेलवलकरांची भूमिका या चित्रपटात नाना पाटेकर साकारत आहेत. त्याचसोबत विक्रम गोखले आणि रिमा लागू हेदेखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. येत्या १ जानेवारी प्रदर्शित होणारा नटसम्राट तिकीट बारीवर किती कोटींचा गल्ला जमावितो हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.