Sai Pallavi Hair Care Routine: अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अभिनयाबरोबरच साधेपणासाठी ओळखली जाते. साई पल्लवी मेकअप करत नाही. ती तिच्या नैसर्गिक सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. खऱ्या आयुष्यात सौंदर्य प्रसाधनांपासून दूर असलेली साई पल्लवी फक्त काजळ, टिकली लावते आणि सन स्क्रीन वापरते.

साई पल्लवी सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करत नाही. तसेच केस स्टाइल करण्यासाठी कोणतीही उत्पादने वापरत नाही. ती त्वचा व केसंसाठी नैसर्गिक उत्पादनं वापरते. आहार चांगला घेण्याकडे तिचा कल असतो, ज्यामुळे तिची त्वचा व केस दोन्हीचे आरोग्य चांगले राहते.

साई पल्लवीच्या नैसर्गिक तजेलदार त्वचेचं रहस्य तिचा आहार आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, साई पल्लवी फक्त सकस आहार घेते. “मी फक्त सकस आहार घेते, यामुळे माझी त्वचा तजेलदार राहते,” असं साई पल्लवी म्हणाली होते. तिच्या आहारात फळे, भाज्या यांचा समावेश असतो.

साई पल्लवी फिट राहण्यासाठी रोज व्यायाम करते. ती भरपूर पाणी पिते, त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. परिणामी तिची त्वचाही चांगली राहते. साई पल्लवी चांगला आहार घेते. नियमित व्यायाम व्यायाम करते, भरपूर पाणी पिते आणि नैसर्गिक वस्तूंचा त्वचा व केसांसाठी वापर करते.

दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा सौम्य क्लिंझर, हलका टोनर व मॉइश्चरायझर वापरते. उन्हाळ्यात ती हलके टिंटेड मॉइश्चरायझर आणि रात्री जेली बेस्ड मॉइश्चरायझर वापरते. तसेच तिला हळद, दही व मध या पासून तयार केलेला फेसपॅक सर्वात जास्त आवडतो. घराबाहेर पडण्याआधी ती न विसरता सनस्क्रीन लावते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम रसायने असलेली उत्पादनं वापरत नाही साई पल्लवी

“मी कधीही कृत्रिम रसायने असलेले शाम्पू आणि साबण वापरत नाही. मी फक्त नैसर्गिक उत्पादने वापरते,” असं साई पल्लवी म्हणाली. ती मेकअप उत्पादनेही वापरत नाही कारण त्याचा तिच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो, असं तिने सांगितलं.