नवाझचा सोहैलशी खास दोस्ताना

तिन्ही भावंडांमध्ये सोहैलशी आपले जास्त जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे नवाझने सांगितले.

‘किक’, ‘बजरंगी भाईजान’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर सलमान खानच्या निकटवर्तीयांमध्ये अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीची गणना होऊ लागली आहे. सलमान, अरबाझ आणि सोहैल खान या तिन्ही भावंडांशी सध्या घरोबा असलेला नवाझ पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून सोहैलबरोबर आणि सहअभिनेता म्हणून अरबाझ खानबरोबर काम करतो आहे. अर्थात, नवाझने पहिल्यांदा सलमानबरोबरच काम केले आहे आणि आपल्या अभिनयाने त्याला जिंकून घेतले असल्याने त्याचा भाईशी खास दोस्ताना असणे समजू शकते. मात्र या तिन्ही भावंडांमध्ये सोहैलशी आपले जास्त जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे नवाझने सांगितले.

सोहैल एरव्हीही कमी बोलतो. मात्र एक दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर मित्र म्हणूनही काहीही न बोलता, सर्व काही समजून घेणारा असा त्याचा स्वभाव असल्याने त्याच्याशी आपले खास नाते असल्याचे नवाझने सांगितले. दिग्दर्शक म्हणून ‘फ्रिकी अली’ या चित्रपटात सोहैलबरोबर काम करताना एकदाही त्याचा संयम ढासळलेला मी पाहिलेला नाही. सोहैलला कठिणात कठीण प्रसंगातून जाताना पाहिले, पण या प्रत्येक प्रसंगात तो शांतपणे आणि धर्याने उभा राहिला. त्याच्याकडून ही खूप मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे हे सांगत नवाझने भाईपेक्षाही सोहैलचा दोस्ताना लाखमोलाचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nawazuddin siddiqui sohail khan friendship

ताज्या बातम्या