झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. अनेक कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहून प्रेक्षकांना फार आनंद होत असल्याचे दिसत आहे. दररोज विविध कलाकार सहभागी होणाऱ्या या कार्यक्रमात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय मंडळीही सहभागी होताना दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाजपा नेत्या चित्रा वाघ, रुपाली ठोंबरे यांसह विविध महिला राजकीय नेत्यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यानंतर आता या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज सहभागी होताना दिसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नुकतंच झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात हजेरी लावली. नुकतंच झी मराठीने या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

“पॅक-अपनंतर आम्ही आधी त्यावरचं रक्त काढायचो अन्…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

या व्हिडीओची सुरुवात एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांच्या एंट्रीने होते. यावेळी त्यांच्या एंट्रीदरम्यान ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत असते. या गाण्यादरम्यान ते दोघेही मिठी मारुन डान्स करताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही किचनमध्ये जेवण बनवत असताना संकर्षण कऱ्हाडे त्यांच्यासोबत एक मजेशीर खेळ खेळताना दिसत आहे.

‘तुम्हा दोघांना स्क्रीनवर एक फोटो दाखवला जाईल. त्यांना पाहून तुम्हाला कोणतं गाणं आठवतंय हे तुम्ही सांगायचे’ असा गेम असल्याचे तो सांगतो. त्यानंतर स्क्रीनवर शिवसेना नेते संजय राऊतांचा एक फोटो दिसतो. तो पाहिल्यावर एकनाथ खडसे लगेचच त्यावर प्रतिक्रिया देत गाणं म्हणायला सुरुवात करतात. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’, असे गाणे ते यावेळी म्हणतात.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया म्हणाली, “मी हुंडा…”

तर दुसरीकडे किरीट सोमय्या तो फोटो पाहिल्यानंतर ‘नो कमेंट्स’ असे म्हणतात. त्यानंतर पुढे किरीट सोमय्या यांनी ‘साफसफाईला सुरुवात केलीय’, असे मिश्किलपणे म्हणतात. यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक कमेंटही दिसत आहेत.