स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे ह्या मराठी चित्रपटसृष्टीतील या ‘एस’ फॅक्टर्सना एकत्र आणणाऱ्या ‘फुगे’ या आगामी सिनेमातून नीता शेट्टी ही ग्लॅमरस अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. हिंदीचा छोटा पडदा गाजवणारी ही बोल्ड अभिनेत्री ‘फुगे’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रथमच मराठीत पदार्पण करत आहे. यात ती आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार असून, सुबोध भावेच्या प्रेयसीच्या भूमिकेत ती झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘फुगे’ या सिनेमात ती कामिनी नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, ही कामिनी बिन्धास्त, चुलबुली आणि आधुनिक विचारांची आहे. या सिनेमात नीता टॅटू आर्टिस्टची भूमिका करत असल्यामुळे, ‘फुगे’ मधील तिचे व्यक्तिमत्व देखील तसेच रंजक आणि कलाप्रिय असे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खऱ्या आयुष्यातदेखील नीता अगदी तशीच असल्यामुळे कॅमेऱ्यामधील ही कामिनी नेमकी काय धम्माल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यात प्रार्थना बेहेरे, आनंद इंगळे, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांची देखील प्रमुख भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeta shettys glamorous role in fugay marathi movie
First published on: 21-01-2017 at 13:29 IST