लवकरच सोनी वाहिनावरील ‘इंडियन आयडल’ पर्व ११ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. देशातील अनेक लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शोच्या मंचावर परफॉर्म करत आहेत. मात्र या शोच्या ऑडिशन दरम्यान एका स्पर्धकाची कथा ऐकून नेहा भावूक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन आयडल पर्व ११ मध्ये अभिनाश नावाचा एक अंध स्पर्धक मंचावर पोहोचतो. त्याने गाणे सुरु करण्यापूर्वी त्याचा चेहरा का जळाला आहे असा प्रश्न परीक्षकांनी विचारला. त्यावर अभिनाशने अंध असल्यामुळे स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. ते ऐकून नेहा भावूक होते आणि तिला अश्रू अनावर होतात. सोनी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र नेहाचे भावूक होणे नेटकऱ्याच्या फारसे पसंतीला उतरले नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी नेहावर भन्नाट मीम्स व्हायरल केले आहे. हे मीम्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

आणखी वाचा : Video : …म्हणून नेहा कक्करने चपलेने मारले भावाला

काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये ऑडिशमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान नेहा कक्करचा एक चाहता तिच्यासाठी काही गिफ्ट घेऊन शोच्या मंचावर येतो. तो एक-एक करुन नेहाला गिफ्ट देतो. ते पाहून नेहा आनंदी होते आणि त्या स्पर्धकाला मिठी मारते. अचानक तो स्पर्धक कोणताही विचार न करता नेहाच्या गलावर किस घेत असल्याचा प्रकार घडला आहे. शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण स्पर्धकाला थांबवतो आणि नेहा देखील तेथून बाजूला होते. ते सर्व पाहून परीक्षक विशाल दादलानी आणि अनु मलिका देखील हैराण होतात.

आणखी वाचा : नेहाला पाहून भान विसरला; ऑडिशनमध्येच केलं किस

‘इंडियन आयडल’ पर्व ११ च्या ऑडिशन व्हिडीओमध्ये स्पर्धकांची गाणी आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. एक स्पर्धक तर त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला आहे. तर दुसरीकडे एका स्पर्धकाने तो आता पर्यंत काय काम करतो हे त्याच्या कुटुंबीयांना देखील सांगितलेले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar gets emotional after hearing indian idol contestants story inspires memes again avb
First published on: 18-10-2019 at 12:55 IST