scorecardresearch

‘भाबीजी…’ मालिका सोडण्याचे नेहा पेंडसेचे कारण आले समोर

‘भाबीजी घर पर हैं’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

neha pendse, bhabhi ji ghar par hai,
'भाबीजी घर पर हैं' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

छोट्या पडद्यावरील ‘भाबीजी घर पर हैं’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान. मालिकेचे निर्माते आता अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा पेंडसेच्या जागेवर आता दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. तर सध्या त्यांनी अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले.

‘भाबीजी घर पर है’ मालिकेच्या युनिटने सांगितले की, “हे खरं आहे की, आम्ही अनिता भाभीच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहोत. एवढंच काय तर अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले आहे. नेहाचा एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि आता तिला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्याची इच्छा नाही.”

आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

पुढे त्यांनी सांगितले की, “तिच्या शोमधून बाहेर पडण्याचा एक प्रमुख कारण म्हणजे लांबचा प्रवास. सेटवर आणि घरी परतण्यासाठी ती तासनतास प्रवास करते. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर झाला आहे. निर्माते आणि अभिनेत्री यांना वाटले की ते सगळं सांभाळून करू शकतील परंतु आता ते कठीण आहे असे दिसते.”

आणखी वाचा : “एक दिवस रात्री ३ वाजता रस्त्यावर एकटी…”, अक्षयसोबत ब्रेकअपनंतर काय घडले? रवीनाने केला खुलासा

दरम्यान, या आधी अनिता भाभीची भूमिका नेहाआधी सौम्या टंडनने साकारली होती. सौम्याने ऑगस्ट २०२०मध्ये हा शो सोडला होता. त्यानंतर २०२१ मध्ये सौम्याच्या जागेवर नेहा पेंडसेला घेण्यात आले. नेहाने देखील सौम्याप्रमाणे प्रेक्षकांची मने जिंकली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2022 at 13:48 IST

संबंधित बातम्या