न्यू ईयर रिजोल्यूशन पेक्षा नव्या वर्षाचे प्लॅनिंग करण्यावर मी जास्त विश्वास ठेवते. आता माझे जे शोज होत आहेत ते पुढच्या वर्षी देखील सुरु राहणार आहेत, या शोजमधून अधिक जोमाने काम करण्याचा माझा मानस आहे. नुकताच माझा नचिकेत आणि गुरु ठाकूर सोबत कुवेतमध्ये एक यशस्वी कार्यक्रम झाला. तसेच नवीन वर्षात माझे काही आगामी प्रोजेक्ट देखील आहेत. आम्ही एप्रिल महिन्यात एमस्टरडॅममध्ये युरोपियन मराठी संमेलनात कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षातील हा माझा मोठा प्रोजेक्ट असणार आहे. शिवाय २०१६ला माझा ‘मुंबई टाईम’ सिनेमा देखील येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तो प्रदर्शित होत असल्याकारणामुळे मी त्याबद्दल खूप उत्सुक आहे. त्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच आगामी वर्षातील काही सिनेमांचेदेखील मी संगीत दिग्दर्शन करणार आहे.
गायिका – योगिता चितळे
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2015 रोजी प्रकाशित
माझा संकल्पः जास्तीत जास्त काम करण्याचा
न्यू ईयर रिजोल्यूशन पेक्षा नव्या वर्षाचे प्लॅनिंग करण्यावर मी जास्त विश्वास ठेवते.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 27-12-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New yera resolution of singer yogita chitale