बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की झाली आहे. पुढील महिन्यात ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्रियांका आणि निकचा रोका आणि नंतर साखरपुडा पार पडला. त्यानंतर या दोघांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वेबसाईटच्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा पार पडणार आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडणार असून निकचा सारा मित्रपरिवार या लग्नाला उपस्थित राहणार आहे. एकीकडे अनेक बॉलिवूडस्टार डेस्टिनेशन वेडिंग करत असताना प्रियांका मात्र भारतातच लग्न करणार आहे. यासाठी प्रियांकाची पसंती राजस्थानमधल्या जोधपुर या शहराला असणार आहे. जोधपुर किंवा राजस्थानमधल्या आलिशान राजमहालात हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निकनं जोधपुरला भेट दिली होती त्यामुळे त्या दोघांनीही हेच ठिकाण लग्नासाठी निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे.

प्रियांका आणि निक या जोडीबद्दल सांगायचं झालंच तर २०१७ पासून ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. ‘मेट गाला’च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अखेर १८ ऑगस्टला या दोघांनी आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली. दीपिका रणवीरनंतर प्रियांका निक लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे प्रियांका निकचं लग्न बॉलिवूडमधलं ‘बिग फॅट वेडिंग’ असणार हे नक्की!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas and priyanka chopra wedding dates confirmed
First published on: 17-10-2018 at 09:53 IST