या नाताळला सुपरस्टार मोटू- पतलू आता आपल्याला थंडीचा अनुभव देण्यासाठी तयार आहेत. हे दोघेही तुम्हाला अंटार्टिकाची सफर घडवणार आहे. जगभरातील प्रसिद्ध अशा इन्व्हिजिबल विमानाचे फुरफुरीनगरच्या एअर शोमधून अपहरण होते आणि ते कुठेच सापडत नाही. मोटू पतलू आणि त्याची टीम आणखी एका साहसात सहभागी होऊन ते हरवलेले विमान शोधण्याची माोहिम उघडतात. या नवीन मोहिमेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा. २५ डिसेंबरला मोटू पतलूचा हा भाग सकाळी ११.३० वाजता पाहायला विसरु नका.
मोटू पतलूचा हा आकर्षक असा नवीन प्रवास मुलांना नक्कीच आवडेल आणि यामध्ये मुलांना आवडतील असे विनोदही आहेत. डॉ. झटकांच्या मदतीने मोटू- पतलूला विमान अंटार्टिकामध्ये एका खास जागेत ठेवण्यात आले आहे हे त्यांना कळते. पण ती जागा कुठे आहे? विमान कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘मोटू- पतलू- दि इन्व्हिजिबल प्लेन’चा हा भाग तर बघावाच लागेल.
मोटू- पतलूची आकर्षक जोडी आणि त्यांच्या विनोदामुळे मुलांना नक्कीच आनंद मिळाला आहे, त्यामुळे थोड्याच दिवसांत ही जोडी जगभरातील प्रसिद्ध जोडी बनली आहे. यातील विनोद, साहस आणि मनोरंजन गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यांचे वण्डरलँड, मिशन मून, खओस समुद्र, खजिन्याचा शोध आणि कुंग फू लँडनंतर आता हा नवीन आकर्षक सिनेमा आपल्याला अॅक्शन आणि विनोद या दोन्हीची सफर घडवेल.
भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय समाजाशी भावनिक ऋणानुबंध जोडणारी ‘मोटू पतलू’ हे कार्टून्स सुहास दत्तात्रय कडव यांनी जगासमोर आणले आहे. लहान मुलांना वेडावून सोडणाऱ्या मोटू आणि पतलू या कार्टून्सना बच्चेकंपनीत मोठी प्रसिद्धी मिळत आहे. पाश्चिमात्य देशातील कार्टून्स केरेक्टर्सची भारतात वाढणारी क्रेज लक्षात घेता सुहास कडव यांच्या ‘मोटू पतलू’ला देखील मोठी पसंती मिळत आहे. विदेशी केरेक्टर पेक्षा भारतीय केरेक्टरची निर्मिती करण्याचे मोठे धाडस सुहास कडव यांनी या मालिकेच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे ‘मोटू पतलू’चे हे श्रेय आणि भारतीयत्वाचे ब्रीद मोठ्या पडद्यावर साकारण्याचे धाडस आपण केले असल्याचे सुहास सांगतात.
आज प्रत्येक लहान मुलाच्या तोंडात मोटू पतलू या कॅरेक्टर्स ची नावे रेंगाळताना दिसत आहेत. विदेशातील गाजलेल्या कार्टून्स कॅरेक्टर्सना, सर्वाधिक पसंतीच्या यादीत भारताच्या ‘मोटू पतलू’ ने केव्हाच मागे सोडले आहे. भारतीय मुलांच्या भावविश्वाचा आणि मानसिकतेचा आढावा त्यांच्या या कलाकृतीत दिसून येतो. याबद्दल सांगताना सुहास यांनी आपल्या लहान मुलाचे बारीक निरीक्षण केले असल्याचे ते सांगतात, त्याचे हसणे बोलणे तसेच त्याची विचार करण्याची पद्धत या साऱ्यांचे बारीक निरीक्षण करून सुहास यांनी ‘मोटू पतलू’ मध्ये रंग भरला आहे. अशा या लहान मुलांच्या विश्वात रंगलेल्या ‘मोटू पतलू ‘च्या मराठमोळ्या अंदाजाचे जितके कौतुक करता येईल तितके थोडेच!