मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी आणि अभिनेता वरुण तेजची बहीण अभिनेत्री निहारिका कोनिडेलाने तिच्या घटस्फोटाबाबत मौन सोडलं आहे. निहारिकाचं चैतन्य जेव्हीशी २०२० मध्ये लग्न झालं होतं. दोघांनी उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती, पण वर्षभरातच हे जोडपं विभक्त झालं. जुलै २०२३ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोटाची घोषणा केली होती. आता एका मुलाखतीत निहारिकाने घटस्फोटाबाबत आणि झालेल्या त्रासाबद्दल भाष्य केलं आहे.

निहारिका घटस्फोटाबाबत म्हणाली, “आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे. माझ्या आई-वडिलांना माझी गरज असेल तेव्हा मला त्यांच्याजवळ राहायचं आहे. तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर अवलंबून राहू शकत नाही. माझा घटस्फोट होऊन आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत, मला किती त्रास झाला हे फक्त मलाच माहीत आहे.”

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

ती पुढे म्हणाली, “मला आनंद आहे की माझ्याकडे नागाबाबूसारखे वडील आहेत, ज्यांनी म्हटलं की कोण काय बोलतं याची त्यांना पर्वा नाही. मी आनंदी राहण्यास पात्र आहे. माझ्या घटस्फोटामुळे मला कुटुंबाची किंमत कळाली आहे. प्रत्येकजण आयुष्यभर लग्न टिकेल या आशेने लग्न करतो, परंतु माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. मी फक्त ३० वर्षांची आहे. मी भविष्यात कधी तरी प्रेमातही पडेन. पण या सर्व गोष्टीआधी मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि स्वतःवर काम करायचं आहे. सध्या मी सिंगल आहे.”

लेक घरी नसताना जावयाने गर्ल गँगसह केली पार्टी; अंकिता लोखंडेच्या आई म्हणाल्या, “विकीने त्या सर्वांना…”

निहारिका ही अभिनेते व निर्माते नागेंद्र बाबू आणि पद्मजा यांची मुलगी आहे. ती चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची पुतणी आहे. वरुण तेज हा तिचा भाऊ आहे आणि ती राम चरण, साई धरम तेज, वैष्णव तेज आणि अल्लू अर्जुन यांची चुलत बहीण आहे. निहारिका सध्या तिच्या अभिनय करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.