प्रत्येक कलाकाराची आनंदाची आपली कल्पना आणि इच्छा असते. एकाच शुक्रावारी दोन मराठी चित्रपट झळकणे याचा आनंद खूप असतो. निशा परुळेकरबाबत तसे होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी तिची भूमिका असणारे ‘महानायक’ आणि ‘शिणमा’ असे दोन चित्रपट एकाच दिवळी प्रदर्शित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महानायक’ हा चित्रपट साठ-सत्तच्या दशकातील लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. यात निशा परुळेकरने मुख्यमंत्री नाईक यांची पत्नी वत्सला हिची भूमिका साकारली आहे. तर ‘शिणमा’मध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एका गावात चित्रपटाच्या चित्रकरणाचा फड उभा राहतो ही कल्पाना आहे. त्यातील दिग्दर्शकाच्या पत्नीच्या भूमिकेत निशा आहे.

एकाच शुक्रवारी माझे दोन मराठी चित्रपट झळकत असल्याने मला विशेष रोमांचित वाटत आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या यशस्वी आणि चौफेर कारकिर्दिचा हा महत्वाचा टप्पा आहे, अशी यावर निशाने आपली प्रितक्रिया व्यक्त केली.

‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई २’ या चित्रपटांच्या यशाने मराठी चित्रपटाबाबत निर्माण झालेल्या सकारात्मक उत्साही वातावरणाचा आपल्या चित्रपटाला फायदा होईल असाही निशाने विश्वास व्यक्त केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nisha parulekar in mahanayak and shinma
First published on: 23-11-2015 at 16:33 IST