अँड्रॉइडवरील गेम अॅपला दहा लाखांहून अधिक डाऊनलोड्स
बॉलिवूडमध्ये सध्या कोणताही चित्रपट झळकल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत तो किती ‘गल्लेबाजी’ करतो, याकडे आकडेतज्ज्ञांचे लक्ष असते. मात्र आता त्याहीपुढे जाऊन चित्रपटाच्या कमाईबरोबरच मोबाइलवरील डाऊनलोड्सवरही सध्या सर्वाचे लक्ष लागले आहे. हे डाऊनलोड्स चित्रपटाचे नाही, तर चित्रपटाच्या गेम अॅप्लिकेशन्सचे आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने पहिल्या तीन दिवसांत ७० कोटींवर गल्ला जमा केला असताना या चित्रपटाच्या गेम अॅप्लिकेशनलाही चांगलेच हीट्स मिळाले आहेत. चित्रपट प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी अँड्रॉइडवर आलेल्या या गेम अॅपने आतापर्यंत दहा लाखांहून अधिक डाऊनलोड्स मिळवले आहेत.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूडमध्ये अनेकानेक क्लृप्त्या लढवण्याच्या काळात मोबाइलसारख्या प्रत्येकाच्या हातात असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणे अशक्य आहे. आतापर्यंत मोबाइलवर चित्रपटाचे फोटो, गाणी, रिंगटोन्स वगैरे गोष्टी सर्रास डाऊनलोड करता येत होत्या. मात्र आता याच्याही पुढे जाऊन बॉलिवूडने तरुणाईला अधिक आकर्षित करण्यासाठी चित्रपटांचे गेम्स तयार केले आहेत. याआधी ‘बर्फी’ या चित्रपटाच्या गेमलाही मोबाइलधारकांनी पसंती दिली होती. अँड्रॉइड प्रणालीवर या गेमला पाच लाखांहून अधिक डाऊनलोड्स आहेत.
अगदी चारच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ तिकिटबारीवर चांगला धंदा करणार, ही अपेक्षा आधीपासूनच होती. रोहित शेट्टी आणि शाहरुख खान यांच्या युतीला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देतील, यात काही वादच नव्हता. मात्र अधिकाधिक प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी या चित्रपटाचे एक गेम अॅप्लिकेशनही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी प्रसारित केले गेले. दीपिका पडुकोणचा दाक्षिणात्य लूक, बऱ्याच दिवसांनी शाहरुख खानची एण्ट्री यामुळे आधीच हव्या असलेल्या या चित्रपटाच्या गेम अॅप्लिकेशनलाही दणादण हिट्स मिळाले. आता पाचच दिवसांत तब्बल दहा लाख लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे. प्ले स्टोअरमध्ये हा गेम फुकट असल्याने येत्या काही दिवसांत या डाऊनलोड्सची संख्या वाढणार आहे.
‘बर्फी’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटांच्या आधी सलमान खानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता.
मात्र त्या चित्रपटाच्या वेळी अशा प्रकारे
गेम अॅप विकसित करण्यात आले
नव्हते. सध्या शाहरुखच्या चित्रपटाच्या
गेम अॅपला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमाननेही आपल्या पुढील चित्रपटाचे गेम अॅप विकसित करण्याची तयारी चालू केल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2013 रोजी प्रकाशित
मोबाइलवरही ‘चेन्नई एक्स्प्रेस’
बॉलिवूडमध्ये सध्या कोणताही चित्रपट झळकल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत तो किती ‘गल्लेबाजी’ करतो, याकडे आकडेतज्ज्ञांचे लक्ष असते. मात्र आता त्याहीपुढे जाऊन चित्रपटाच्या कमाईबरोबरच मोबाइलवरील डाऊनलोड्सवरही सध्या सर्वाचे लक्ष लागले आहे.
First published on: 13-08-2013 at 08:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now chennai express on mobile