खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. नुसरत या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

नुसरत यांना नेहमीच त्यांच्या लग्नावरून बोललं जातं, एवढंच नाही तर त्यांच्या मुलाच्या वडिलांचे नाव कास असा प्रश्न सतत विचारला जातो. नुसरत यांनी ‘इंडिया टुडे’ला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ट्रोलर्सला नुसरत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. नुसरत यांनी १९ जून २०१९ मध्ये तुर्कीत निखील जैनशी लग्न केले होते. ते नोव्हेंबर २०२० मध्ये विभक्त झाले. गेल्या वर्षी त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु होती. यावर नुसरत यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

त्यावर नुसरत म्हणाल्या, “माझ्या लग्नाला कुणी एक रुपया दिलेला नाही, लग्नाचा खर्चही कुणी केलेला नाही. मग मला माझ्या लग्नावरुन बोलणाऱ्यांची मी पर्वाही करत नाही. मला माहिती आहे की, मी प्रामाणिक आहे. मला कुठल्याही गोष्टींवरुन स्पष्टीकरण द्यायला आवडत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाचा विचारला हा विचित्र प्रश्न

पुढे नुसरत म्हणाल्या, “माझी चुकीची इमेज दाखवण्यात आली आहे आणि आता मी ते स्पष्ट केले आहे. इतरांना दोष देणे किंवा इतरांची चूक आहे हे दाखवणे सोपे आहे.” नुसरत यांनी दावा केला की या संपूर्ण प्रकरणात कोणाचीही प्रतिमा खराब केली नाही.