ऑस्कर विजेते दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन हे आता एनएसएची गुपिते उघड करणारा जागल्या एडवर्ड स्नोडेन याच्या चित्तथरारक जीवनकहाणीवरील चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, त्यांनी यापूर्वी जेएफरे, निक्सन व डब्ल्यू हे चित्तथरारक राजकीय चित्रपट त्यांनी दिग्दर्शक होते.
स्टोन व त्यांचे निर्माते भागीदार मोर्टिझ बोरमन यांनी द स्नोडेन फाइल्स -द इनसाइड स्टोरी ऑफ द वर्ल्डस मोस्ट वाँटेड मॅन या पुस्तकाचे लेखक पत्रतार ल्युक हार्डिग यांच्याकडून चित्रपटाचे हक्क घेतले आहेत.
स्नोडेन याने ‘गार्डियन’ वृत्तपत्रात जे गौप्यस्फोट केले होते त्यांच्या आधारे हे पुस्तक लिहिण्यात आले होते. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा कंत्राटदार स्नोडेन याने अमेरिकेने विविध देशांतील लोकांच्या संगणक व फोनवरील माहिती चोरल्याबाबत वर्गीकृत माहिती उघड केली होती, त्याने ही कागदपत्रे जून २०१३ मध्ये ग्लेन ग्रीनवाल्ड या ‘गार्डियन’ वृत्तपत्राच्या स्तंभलेखकाकडे उघड केली होती. हार्डिग व गार्डियनचे इतर पत्रकार या चित्रपटाच्या निर्मितीत सल्लागार म्हणून भूमिका पार पाडणार आहेत. आताच्या काळातील ही सर्वात मोठी गोष्ट आहे व ते सगळे आव्हानात्मक होते, गार्डियन आमच्यासोबत काम करीत आहे, ही चांगली बाब आहे असे दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन यांनी सांगितले.
फिडेल कॅस्ट्रो व ह्य़ुगो चावेझ यांच्यावर त्यांनी माहितीपट काढले होते. स्नोडेन यांच्या गौप्यस्फोटामुळे अमेरिकेचे माहिती चोरीचे व टेहळणीचे खरे स्वरूप उघड झाले होते. स्नोडेन आता रशियात आश्रयाला आहे. तो अमेरिकेत आला, तर त्याला ३० वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2014 रोजी प्रकाशित
ऑस्कर विजेते ऑलिव्हर स्टोन एडवर्ड स्नोडेनवर चित्रपट दिग्दर्शित करणार
ऑस्कर विजेते दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन हे आता एनएसएची गुपिते उघड करणारा जागल्या एडवर्ड स्नोडेन याच्या चित्तथरारक जीवनकहाणीवरील चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत,

First published on: 04-06-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oliver stone will direct film on edward snowden