MM Keeravaani Padma Shri Award : ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बुधवारी(५ एप्रिल) कीरावनींचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन कीरावाणींना सन्मानित करण्यात आलं.

राष्ट्रपती भवनात बुधवारी मनोरंजन क्षेत्रासाठी योगदान दिलेल्या कलाकारांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलं. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीही उपस्थिती दर्शविली होती. पद्मश्री पुरस्कार सोहळ्यातील एमएम कीरावनी यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा>> भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी रवीना टंडनचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, पाहा व्हिडीओ

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या श्रेणीचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं. या गाण्याचे एमएम कीरावनी संगीतकार आहेत. कीरावनी यांच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तबलावादक झाकीर हुसेन आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना अनुक्रमे पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत एम एम कीरावनी?

एम एम कीरावनी तेलुगु चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. साहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘मनासु ममता’ या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. किरावनी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार नावावर केले आहेत. नाटू नाटू’ साठीच त्यांना गोल्डन ग्लोब्सचा अवॉर्डही मिळाला. ‘मगधीरा’ व ‘बाहुबली २’ या चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.