अभिनेत्री सुश्मिता सेन ही सध्या तिच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ‘ताली’ ही वेबसीरिज येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘ताली’ ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजचा टीझर सध्या चांगलाच चर्चेत आहे.
आणखी वाचा : वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या “तुमच्यासारखा बाप…”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ या वेबसीरिजच्या टीझरची सुरुवात गौरी सावंत यांच्या परिचयापासून होते. “नमस्कार मी गौरी. तुमची श्री गौरी सावंत. जिला कोणी हिजडा बोलतं, तर कोणी सामाजिक कार्यकर्ती, कोणी नाटकी म्हणवतं, तर कोणी गेम चेंजर. ही कथा याच सर्व प्रवासाची आहे”, असे यात पाहायला मिळत आहे.

“गाली से ताली तक”, “स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मला हे तिन्हीही हवं आहे”, असे अनेक डायलॉग यात ऐकायला मिळत आहे. यात सुश्मिता सेनचा जबरदस्त लूकही पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये गौरी सावंत यांचा प्रवास उलडणार आहे.

आणखी वाचा : तृतीयपंथी विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? गौरी सावंत यांनी सांगितले खरे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित केली जाणार आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असतील, असं बोललं जात आहे.