करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट उद्या, २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. यादरम्यान, अभिनेत्रीने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातील ‘रॉकी और रानी’ कोण हे सांगितले.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह नुकतेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंदीगडमध्ये गेले होते. त्यावेळी आलिया असा प्रश्न विचारण्यात आला की, ‘बिग बॉस ओटीटीच्या घरात ‘रॉकी और रानी’ सारखे कोण आहे?’ यावर आलियाने एल्विश आणि मनीषा रानीचे नाव घेतले.

हेही वाचा – “आयुष्यातला पहिला आदर्श”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची ‘त्या’ व्यक्तीसाठी खास पोस्ट, म्हणाली, ‘आदरयुक्त प्रेम…’

आलिया म्हणाली की, ‘एल्विश मला खूप रॉकी वाटतो. ज्या पद्धतीने त्याचा बोलण्याचा अंदाज आहे. तो खूप मनोरंजन करतो. खूप विनोदी आहे. मला खूप आवडतो. त्यामुळे एल्विश या शोमधला रॉकी आहे. आणि मनीषा रानी ही रानी आहे. कारण तिच्या नावात रानी आहे. त्यामुळे मला असे वाटते की, त्यांची जोडी खूप क्यूट वाटू शकते.”

त्यानंतर अभिनेत्री पुढे म्हणते की, “पण मी पूजा भट्ट हिचेही नाव घेऊ इच्छिते. कारण ती आमच्या भट्ट कुटुंबातील रानी आहे. ती जशी आहे, ती एकदम रानीप्रमाणे आहे.”

हेही वाचा – Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांसाठी दिली खुशखबर, लवकरच….

हेही वाचा – Video: “नवरा दुसऱ्या मुलींबरोबर…” अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ रीलवर नेटकऱ्याची कमेंट, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया व रणवीर व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतो, हे येत्या काळात समजेल.